ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

गुंतवणुकीच्या योजनेतून महिलेला नऊ लाखांना गंडवले

0

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शहरात अनेक व्यावसायिक सोन्यात गुंतवणूक योजना चालवीत आहेत. अनेक बेकायदा सुरु आहेत.

अशाच एका योजनेत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेला लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

Advertisement

यामध्ये महिलेला सोन्याची गुंतवणूक करण्यास सांगितले, व लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात योगिता अजित पवार या महिलेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून दोघा पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

या प्रकरणी फिर्यादीने म्हंटले आहे कि, आरोपी बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांनी ज्वेल गोल्डी प्रा. लि. स्कीम योजना वैष्णवी अलंकार गृहा मार्फत जाहीर केली आहे.

या योजनेत १० ग्राम सोन्याला एक महिन्याला १ हजार रुपये मिळतील असे सांगितले. यानंतर खोटा विश्वास व खात्री देऊन २९ तोळे १३ मिली ग्राम सोने व ६० हजार रुपये घेतले.

Advertisement

या सोन्यावर मिळणारी रक्कम न देता या रकमेचे स्कीममध्ये सोने वाढविले आहे असे खोटे सांगितले. त्यांनी संगनमताने ९ लाख ३३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २०१६ पासून चार वर्ष चालू होता असे फिर्यादीत म्हंटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li