महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला काही तासातच केले गजाआड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरातील एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर नातेवाईकाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, कुटुंबियांसमवेत मी पानोडीमध्ये राहते. आमचे नातेवाईक अण्णा लहानु घुगे यांची पत्नी पुणे येथे कामाला असल्याने ते, पत्नी व मुले पुण्याला राहतात.

शेतीतील कामानिमित्त अण्णा घुगे हे पानोडीला येत असतात. मागील आठ दिवसांपासून शेतीच्या कामासाठी ते गावी आले होते. दि. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास मी आमच्या शेतात गवत कापण्यासाठी गेले असताना अण्णा घुगेनी माझ्यावर बळजबरीने अत्याचार करून पळून गेला. यामुळे मला अनेक ठिकाणी दुखापत झाली आहे.

घरी येऊन मी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपी अण्णा लहानु घुगे याच्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अवघ्या काही तासांत आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांंनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment