वयाच्या सोळाव्या वर्षी अनिल कराळे शिवसेनेत सक्रिय झाले आणि…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मिरी, करंजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य व शिवसेनेचे गटनेते अनिल कराळे यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले.

श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना १३ ऑक्टोबरला दाखल करण्यात आले होते. महिनाभर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी कराळे शिवसेनेत सक्रिय झाले.

२००१ मध्ये ते कामतशिंगव्याचे सरपंच झाले. त्यांनी मिरी पंचायत समिती गणातून निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

नंतर या गटाच्या जि. प. सदस्य मोनिका राजळे आमदार झाल्यानंतर पोटनिवडणुकीत कराळे यांच्या पत्नी उषा निवडून आल्या. पुढील निवडणुकीत अनिल कराळे स्वत: विजयी झाले.

गेल्या तीन वर्षांपासून ते मिरी करंजी गटाचे नेतृत्व करत होते. आपल्या वक्तृत्व शैलीने त्यांनी अनेकांचे लक्ष वेधले. गटनेता म्हणून काम करताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात ठसा उमटवला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment