ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

डॉ.विखे पाटील, मॅककेअर व गरूड हॉस्पीटलमधील कॅन्सरयोध्दांस दिवाळी भेट

0

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कॅन्सर झाला की ती व्यक्ती व त्यांचे नातेवाईक खचतात कारण पहिला होणारा खर्च तसेच बर होणारा का? यामुळे आरंभ ही संस्था याकरीताच काम करत आहे.

तुम्ही हसत रहा,खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, गोळया घ्या, पथ पाळा, बरे व्हा कुठल्याही प्रकारची गरज भासल्यास संपर्क साधा वेदनेशी लढणाऱ्या चेहऱ्यांना बळ देउयात हे आरंभचे ब्रीद आहे. असे प्रतिपादन आरंभचे अध्यक्ष चाँद शेख यांनी केले.

Advertisement

दिवाळीनिमित्ताने आरंभ पॉलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर व सहकारी मित्र परीवाराच्या वतीने विळद घाट येथील डॉ.विखे पाटील हॉस्पीटल व झोपडी कॅन्टीन येथील मॅककेअर व गरूड हॉस्पीटलमधील कॅन्सर योध्दांस दिवाळी भेट देण्यात आली. यावेळी विखे पाटील हॉस्पीटलचे डॉ.भूषण निकम, मॅककेअर हॉस्पीटलचे डॉ सतीश सोनवणे,

डॉ गरूड हॉस्पीटलचे डॉ.प्रकाश गरुड, आरंभचे अध्यक्ष चाँद शेख, तान्या मुलतानी, आरंभचे खजिनदार गणेश भोसले, जितेंद्र देवकर, विकास जाधव, नितीन भोसले, स्नेहा शेंदूरकर, शिवाजी जाधव, सुमन गवारी, वज्रेश्ववरी नोमुल, शर्मिला कदम, विवेक शिंदे, प्रदीप कनोजिया आदि उपस्थित होते.

Advertisement

डॉ.सतीश सोनवणे म्हणाले की,एखादया कॅन्सर समजला की,प्रथमत. ती व्यक्ती व नंतर घरातील सर्व व्यक्ती हतबल व निराश होते.सातत्याने कॅन्सरशी लढत असलेल्या रूग्णाना या निमित्ताने प्रेरणा ताकद तसेच त्यांच्या लढाईला साथ देण्याचे काम हे करत आहेत. प्रत्येक रूग्णांशी आरंभचे सहकारी जेव्हा संवाद साधत होते.

तेव्हा प्रत्येकाच्या डोळयात आनंदाचे व आपल्याकरीता दुसरी व्यक्ती काहीतरी करते यांचा अभिमान दिसत होता. आरंभचे जे ब्रीद वाक्य आहे हे या निमित्ताने साथ होत आहे. नकळतपणे या कॅन्सरयोध्दाचे हात आशिर्वादाकरीता डोक्यावर कधी येत होते हे समजत नव्हते.

Advertisement

कुणी बेकरी,कुणी गृहीणी,दुकानदार,नोकरदार वयस्कर,तरूण असे विविध क्षेत्र व वयोगटातील योध्दे येथे लढत आहे.आज प्रत्येकजण आपल्या घरी दिवाळी साजरी करतो परंतू योध्दे व त्यांचे नातेवाईक मात्र हॉस्पिटलमध्येच….त्यामुळेच आरंभतील पुनीत हा ब्लडकॅन्सरपिडीत आहे त्याने या सर्वाकरीता पणती मणुके व छोटासा केक दिवाळीची भेट दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li