दूध उत्पादक शेतकऱ्यांना अकरा लाखांचा बोनस वाटप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :- गोधन फार्मतर्फे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूध व्यवसायात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुरी तालुक्यातील मालुंजे येथे आधुनिक दूध संकलन केंद्र उभारले.

तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीबरोबर सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. यातच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोधन फार्मतर्फे मागील वर्षभरात दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या बिलातून एक पैसाही कपात न करता,

दिवाळी बोनस म्हणून निव्वळ नफ्यातून प्रतिलीटर एक रुपया 51 पैसे प्रमाणे अकरा लाख रुपये वाटप केले. तसेच अरुणोद्य मिल्ककडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी फराळ व लाभांश वाटप दूध संकलन केंद्राच्या संचालकांना चांदीचे नाणे भेट देण्यात आले.

गोधन फार्मच्या अध्यक्ष ज्योती चौगुले, संचालक निखिल चौरे, दैवत डेअरीचे अध्यक्ष केशव शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment