केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या संकटमय काळात केंद्राच्या आडमुठ्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच कोरोनाने आर्थिक हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत.

यातच केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (पी. एम. किसान) योजनेंतर्गत मागील वर्षापासून प्रत्येकी २ हजार रुपये मदत दिली जात होती. मात्र, केंद्र शासनाने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून ऐन दिवाळीच्यावेळी ही रक्कम परस्पर काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली. शेतकऱ्यांचे कोरोना संकटामुळे कंबरडे मोडले असताना राज्य शासन त्यांना वेळोवेळी मदत करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळत आहे. मागील वर्षी देखील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते.

यावर्षी देखील अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे कोरोना संकटात देखील राज्य शासन मदत करीत आहे, तर दुसरीकडे पी. एम. किसान योजनेची रक्कम केंद्र शासनाने परस्पर काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करताना सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. मदतीची रक्कम केंद्र शासनाने परत घेतली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment