ठेकेदार झाला गायब तालुक्यात उडाला स्वच्छतेचा बाेजवारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2020 :-संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबलेल जात असताना श्रीरामपूर नगरपालिकेकडून स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जागोजागी पडलेला कचरा, प्लास्टिकचा बेसुमार वापर यावरून उरण नगरपालिकेने शहरात स्वच्छतेसंदर्भात केवळ बॅनरबाजी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कचऱ्यामुळे शहरात दुर्गंधी पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईही पसरत आहे.

त्यामुळे नगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. दरम्यान पालिकेचा घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका सुधर्म एनव्हार्नमेंट सोल्यूशन कंपनीला देण्यात आला होता. मात्र, हा ठेका परवडत नसल्याचे पत्र ठेकेदाराने अनेक वेळा प्रशासनाला दिले होते.

त्यावर तोडगाही काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आता दिवाळीत शहराला स्वच्छतेची गरज असताना ठेकेदाराने पळ काढला आहे. सुधर्म एनव्हार्नमेंट सोल्यूशन (चांदवड, नाशिक), सहकार्य सप्लायर्स अँड अर्थमुव्हर्स (नगर), सृष्टी एंटरप्राइजेस (गंगापूर), द्वारका स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था (एरंडोल, जळगाव), बी. एस. एंटरप्राइजेस (नाशिक), सह्याद्री कन्स्ट्रक्शन (नाशिक) आदींनी निविदा सादर केल्या होत्या.

हा ठेका सुधर्म कंपनीला १४ व्या वित्त आयोगातील प्राप्त निधीतून २५ लाख ३६ हजार ८०८ रुपयांना जून २०२० ते मे २०२१ या कालावधीसाठी दिला गेला. त्यावेळीही विरोधकांनी आरोपांची झोड उठवली होती. ठेकेदाराने काम सुरू केले. मात्र, ठेकेदार कंपनीने परवडत नसल्याचे कारण देत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पत्र देऊन काम बंद करण्याचा इशारा दिल्याने पालिकेपुढे पेच निर्माण केला. त्यातून मार्ग काढून ठेका पुढे सुरू राहिला.

सफाई कर्मचाऱ्यांनी वेतन थकले, म्हणून २९ ऑक्टोबरला कामावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळीही शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, नगरपालिकेने ठेकेदाराला वेतनासाठी पैसे दिल्याने मार्ग निघाला. आता ठेकेदारच गायब झाल्याने नगरपालिकेपुढे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता सुरू आहे. ठेकेदाराने अचानक काम थांबवणे बेकायदेशीर आहे. ऐन दिवाळीत पालिकेला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सांगितले. सुरक्षा अनामत जप्त करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment