चार कोटींची रोकड पळवणारी व्हॅन सापडली मात्र रोकड लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- मुंबईमधील विरारमध्ये गुरुवार रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरने पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली होती.

दरम्यान या वाहनात तब्बल सव्वा चार करोड रुपये असून अर्नाळा पोलिसांनी नोकराने चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अखेर ही व्हॅन भिवंडी परिसरात एका निर्जनस्थळी आढळून आली आहे. मात्र, गाडीतून 4 कोटींची रक्कम लंपास करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅनच आरोपी ड्रायव्हरने गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. रायडर कंपनीचे कंत्राट असलेल्या कॅशव्हॅनमध्ये 4 करोड 58 लाख रुपयांची रोख रक्कम होती.

त्यातील आजूबाजूच्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरण्यात आले होते व सव्वा चार करोड रुपये गाडीत होते. संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅशव्हॅन आली. गाडीतील लोडर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर ड्रायव्हर आरोपी कॅशव्हॅनसह पळून गेला आहे.

एम एच 43 बीपी 4976 ह्या नंबरची कॅशव्हॅन भिवंडी तालुक्यातील निर्जळस्थळी पोलिसांना सापडली आहे. यातील चोरीचे सव्वा चार करोड रुपये चोरी करून आरोपी पसार झाले आहे. या व्हॅनच्या शोधासाठी तीन पथक तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा वसई विरार पोलिसांसकडून कसून तपास सुरू आहे,

अशी माहिती पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली. सदर आरोपी ड्रायव्हरची ओळख, घराचा पत्ता, कागदपत्रे पोलिसांना सापडली असून लवकरच आरोपी सापडला जाईल असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment