अहमदनगर ब्रेकिंग : माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या घरावर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-माहिती अधिकार कार्यकर्ते बबनराव कवाद यांच्या निघोज येथील घरावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून सीसीटीव्ही कॅमरे, दारे, खिडक्या तोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

आवाज आल्यामुळे कवाद यांचा मुलगा तसेच मुलगी जागे होऊन त्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास तीन ते चार व्यक्ती कवाद यांच्या घराच्या अंगणात आल्या. घराबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून त्यांनी घराची दारे तसेच खिडक्या तोडण्यास सुरूवात केली.

आवाज झाल्याने कवाद यांचा मुलगा व मुलगी जागे झाले. त्यांनी कवाद यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहीती दिल्यानंतर कवाद यांनी निघोज दूरक्षेत्राचे पोलिस तसेच शेजाऱ्यांना माहीती दिली. पोलिस तसेच शेजारी घटनास्थळी येत असल्याचे पाहून हल्लेखोर पसार झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved