नियमांचे उल्लंघन केल्याने पुण्यातील सारसबाग बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याने सारसबाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला.

तसेच शहरातील सुरू करण्यात आलेल्या अन्य उद्यानांमध्येही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास तीही उद्याने बंद करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील उद्याने बंद करण्यात आली होती. शहरात लहान-मोठी अशी २०४ उद्याने आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक महिन्यांपासून बंद असलेली उद्याने खुली करण्याबाबत नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. राज्यातील अन्य मोठय़ा शहरांमधील उद्याने अद्यापही बंद आहेत.

मात्र, महापालिकेने पहिल्या टप्प्यात ८१ उद्याने १ नोव्हेंबरपासून खुली केली होती. मात्र, उद्याने सुरू करताना दहा वर्षांखालील मुले आणि ६५ पेक्षा अधिक वय असणारे नागरिक, गर्भवती महिला, अन्य आजार या व्यक्तींना प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते.

हास्य क्लब, योग, दिवाळी पहाट कार्यक्रम, यांना बंदी घालण्यात आली होती. तसेच उद्यानात येणाऱ्यांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment