डॉक्टरला चाळीस लाखांना गंडवले; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-संगमनेरात एका नामांकित डॉक्टरांची तब्बल 40 लाख रुपयांना फसवणूक झाली असून त्यांच्या तक्रारीवरुन शहरातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संगमनेर शहरातीलगंगागिर सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ.योगेश बाळकृष्ण गेठे यांनी 04 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2016 रोजी गुंजाळवाडी शिवारात दहा गुंठे जागा दाखविण्यात आली होती. त्यानंतर व्यवहार होऊन गेठे यांनी 20 लाखांचा पहिला टप्पा व व त्यानंतर काही दिवसांतच दुसरा

असे एकूण चाळीस लाख रुपये धनादेशाद्वारे अदा केले. इतकी रक्कम हाती आल्यानंतरही जागा मालक प्रशांत प्रकाश झावरे, वनिता प्रशांत झावरे, प्रवीण प्रकाश झावरे, प्रकाश कोंडाजी झावरे व शारदा प्रकाश झावरे (सर्व रा.घोडेकर मळा) यांनी ठरल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला नाही. त्यामुळे फिर्यादी डॉक्टरने आपण दिलेली रक्कम परत मागितली.

या दरम्यान आपली फसवणूक झाल्याने डॉ. गेठे यांनी न्यायालयाचा दरवाजा गाठला, तेथून आदेश प्राप्त होवूनही आरोपी झावरे कुटुंब फिर्यादी डॉ.गेठे यांचे पैसे द्यायला तयार होत नसल्याने अखेर त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. याबाबत डॉ.योगेश गेठे यांनी शहर पोलीस ठाण्याचे

निरीक्षक मुकूंद देशमुख यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली व पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे वरील पाच जणांवर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सहाय्यक निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे सोपविला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment