‘ति’च्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी गडाखांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा व युवा नेते प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख (वय ३५) यांचे गेल्या काही दिवसांपूर्वी राहत्या घरी निधन झाले होते.

पत्नीच्या अचानक जाण्याने युवा नेते प्रशांत गडाख याना चांगलाच धक्का बसला होता. त्यांच्या दुःखातून अजूनही ते सावरलेले नाही. मात्र अनेकांकडून गडाख परिवाराचे सांत्वन करण्यात आले.

तसेच ‘पत्नीवियोगाच्या दु:खातून माझ्या दोन मुलींनी आणि समाजानं मला सावरलं. मी सतत ‘ति’ला पुस्तकं वाचायला सांगायचो. एका अर्थानं मी ‘ति’ला (कै. गौरी गडाख) वाचनाची सवय लावली त्यातून तिनं ज्ञान वाढलं.

त्यामुळे माझ्या वडिलांशी (ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख) ‘ती’ विविध विषयांवर चर्चा करायची. ‘ति’च्या आत्म्याला शांती मिळावी आणि ‘ति’ला खर्‍या अर्थानं श्रध्दांजली अर्पण करावी,

यासाठी ‘ति’च्या (कै. गौरी प्रशांत गडाख) नावानं प्रशस्त असं वाचनालय सुरु करणार आहोत, असा निर्धार प्रशांत गडाख यांनी आज (दि. १६) व्यक्त केला. कै. गौरी वहिणींच्या दशक्रियाविधीत आपल्या भावना व्यक्त करताना ते बोलत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved