यंदा लॉकडाऊनमुळे वेजिटेबल ऑइलच्या आयातीवर झालाय ‘असा’ परिणाम ; वाचा SEA चा अहवाल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- 31 ऑक्टोबर रोजी संपलेल्या तेल वर्षात (ऑयल ईयर) 2019-20 मध्ये देशाच्या वेजिटेबल ऑयलच्या आयातीत 13% घट झाली आहे.

यावर्षी देशाची एकूण वेजिटेबल ऑयलची आयात 135.25 लाख टन झाली आहे. गेल्या 6 वर्षातील ही सर्वात कमी आयात आहे. कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे हॉटेल,

रेस्टॉरंट्स आणि कॅफेटेरियांची मागणी कमी झाल्याने कुकिंग ऑयलची मागणी कमी राहिली आहे. सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसईए) ही माहिती दिली आहे.

ऑक्टोबरमध्ये 12,66,784 टन वेजिटेबल तेलाची आयात :- एसईएच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर 2020 मध्ये 12,66,784 टन वेजिटेबल तेल (खाद्यतेल आणि नॉन-खाद्य तेल ) आयात केले गेले.

वर्षभरापूर्वी याच काळात 13,78,104 टन वेजिटेबल तेल आयात केले गेले. सन 2019-20 (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) दरम्यान 135.25 लाख टन तेल आयात केले गेले आहे.

तेल वर्ष 2018-19 मध्ये एकूण 155.50 लाख टन वेजिटेबल तेलाची आयात करण्यात आली. SEA ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की मागणी आणि खप कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोविड – 19 .

131.75 लाख टन खाद्य तेल आयात :- आकडेवारीनुसार, तेल वर्ष 2019-20 मध्ये 131.75 लाख टन खाद्यतेल आयात केले गेले. खाद्य तेलाची आयात गेल्या वर्षी याच काळात 149.13 लाख टन होती.

2019- 20 मध्ये गैर खाद्य तेल आयात 45% ने घटून 3,49,172 टन झाली. वर्षभरापूर्वी 6,36,159 टन खाद्यतेल तेल आयात केले गेले. एसईएने म्हटले आहे की जास्त देशांतर्गत उत्पादनामुळे गैर खाद्य तेल आयातही कमी झाली आहे.

रिफाइंड पामोलीन आयातीमध्ये मोठी घसरण :- एसईएच्या आकडेवारीनुसार रिफाईंड पामोलिनच्या आयातीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. 2019-20 मध्ये 4.21 लाख टन रिफाइंड पामोलिन आयात केले गेले आहे.

एका वर्षापूर्वी याच कालावधीत आयात 27.30 लाख टन होती. एसईएच्या मते, 4 सप्टेंबर 2019 रोजी रिफाइंड पामोलीनवर 5% सेफगार्ड शुल्क लागू करण्यात आले. त्यामुळे आयातही कमी झाली आहे.

एसईएच्या मते, यावर्षी 8 जानेवारी रोजी सरकारने आरबीडी पामोलिनला बंदी घातलेल्या यादीमध्ये टाकले. यामुळे त्याच्या आयातीवरही परिणाम झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment