अस्तव्यस्त वाहनांमुळे अपघाताला मिळतेय निमंत्रण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शासनाने घालून दिलेले नियमांची पायमल्ली करण्याचे जणू वतःच नागरिकांनी घेतले असल्याचे नेहमी दिसून येते. नो पार्किंग म्हंटले कि तिथेच वाहने उभी करणार, तसेच वाहतुकीच्या नियम पायदळी तुडवणार यामुळे वाहतूक कोंडी होऊन परिणामी अनेकदा अपघाताला देखील सामोरे जावे लागते असतं,

एडव्हें होऊनदेखील बेजबाबदार नागरिकांमध्ये सुधारणा होईना असेच चित्र सध्या नेवासा मध्ये दिसून येत आहे. बेशिस्त वाहतूक आणि रोडवर गाडी लावणे यामुळे प्रवरासंगम, देवगडफाटा, खडकाफाटा, परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर लहान-मोठी वाहने उभी केली जातात. परिणामी अनेकदा वाहतूक कोंडी होते.

त्याचबरोबर बेशिस्त वाहनांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अलिकडेच झालेल्या एका अपघातात एक मोटारसायकलस्वार ठार झाला. या अपघातानंतर त्या तरुणाच्या मृतदेहावरून अनेक वाहने गेल्याने मृतदेहाचे असंख्य तुकडे झाले चेहरादेखील ओळखण्याजोगा न राहिल्याने त्याची ओळख पटली नाही.

अपघाताच्या घटना परिसरात मोठ्याा प्रमाणात घडत आहेत. आरटीओचे पथक रात्रीच का येते? दिवसा ही यंत्रणा कोठे असते? हा प्रश्न पडत आहे. वाहतूक पोलीसही फक्त टोलनाक्यावरच थांबताना दिसतात. परिसर रोडवर गाडी लावणे जणू काही फॅशन झाली आहे. परिसरात नगर-औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम येथे पोलीस चौकी असूनही धाक राहिला नाही.

बेशिस्त वाहनांना आवर घालण्यास वाहतूक पोलीस कमी पडत आहेत. मोटारसायकलस्वारांना दंड होण्याचे प्रमाण जास्त आहे परंतु मोठ्या वाहनांवर आरटीओ का लक्ष नाही? हा प्रश्न निर्माण होत आहे. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात कंटेनर वाहतूक होते. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्त्यावर नेहमीच कोंडी झालेली असते.

या वाहतूक कोंडीचा प्रश्न कधी सुटणार असा सवाल नागरिक करू लागले आहे. दरम्यान वाहतूक पोलीस, आरटीओ यांनी एकत्रितपणे कठोर कारवाई केल्यास महामार्ग वाहतूक सुखावह होईल, यात शंका नाही. मात्र हि कारवाई कधी होणार याकडे नागरिक लक्ष देऊन आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment