भरदिवसा घर फोडून साडेतीन लाखांचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान दिवसाढवळ्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.

नुकतीच कोपरगाव शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ऐन दिवाळीत घरी कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी श्रद्धानगर भागात राहणारे अक्षय कैलास लोहाडे (वय 26) यांच्या घराची दरवाजाची कडी कोंडा तोडून 3 लाख 65 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची

घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करून 2 लाख 40 हजारांची रोकड, दोन तोळे वजनाची सोन्याची चैन, पाच ग्रँम वजनाच्या सोन्याच्या सहा अंगठ्या असा एकुण 3 लाख 65 हजारांचा ऐवज दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान चोरून नेला आहे.

याबाबत अक्षय कैलास लोहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि दिपक बोरसे हे करत आहेत. भर दिवसा चोरीच्या घटना होत आसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved