नागरिकांवर येतेय संक्रांत तर चोरट्यांची दिवाळी जोरात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-एकीकडे दिवाळीचा सण सुरु आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील २० हजार रुपये रोख रक्कम,

सोन्या- चांदीचे दागिने असा एक लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. निर्मलनगर मधील दिगंबर हौसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत फिर्यादी परमेश्वर गणपती राजूरे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे कि, हे त्यांच्या राहते घराला कुलूप लावून आपल्या मुळगावी गेले होते.

यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचे दरवाजा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करून सामानाची उचकापाचक के‌ली.

दिवानचे कप्प्यात ठेवलेली सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण सुरसे हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment