अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज होताच झाल्या सोशल मिडीयावर ट्रोल ! लोक म्हणाले …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. ‘तिला जगू द्या…’ असे गाण्याचे बोल आहेत. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे गाणं गायलं आहे. 

“कोमल आहे, नाजूक आहे, आहे जरी बावरी…..तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या, खुशाल आपल्या घरी,” असे या गाण्याचे सुरुवातीचे बोल आहे. गीतकार प्राजक्त पटवर्धन यांनी हे गाणं लिहिलं असून अमृता फडणवीसांनी हे गाणं गायलं आहे. अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याला त्यांच्यासह त्यांची मुलगी द्वीजाचा फोटो पाहायला मिळत आहे.

मात्र या गाण्यानंतर अमृता फडणवीस चांगल्याच ट्रोल होताना दिसत आहेत, काहींनी गाण्यावर सडकून टीका केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनीही एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या गाण्यावर टीका केली आहे.

अमृता यांच्या या गाण्याला ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. हि बातमी एडीट करेपर्यंत  युट्यूबवर जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त डिसलाइक या गाण्याला मिळाले आहेत.

Shrikant Shelke ह्या युजर ने म्हंटले आहे ”तिला जगू  द्या म्हणता तुम्ही पण आपला कर्णकर्कश आवाज ऐकून आम्हाला जगू द्या बोलायची वेळ आली आहे

Nikhil Asawadekar म्हणाले आहेत  ”शी शी.. बकवास! ह्या अमृता फडणवीस म्हणजे ‘बटाट्याची चाळ’ मधल्या ‘वरदाबाई’ आहेत! सोटाछाप मलमातल्या जाहिरातीत जसे ‘उंदरास पाहून मांजर’ न्यायाने रोग पळतात तसे घरी आलेले आमचे सारे शेजारी पळाले.

rahul dhotre म्हणाले आहेत बेचव बेसूर आवाज ऐकुन आमची जगण्याची उरली सुरली इच्छा सुधा मेली ओ मामी…. आता महाराष्ट्रात गानरसिकांच्या आत्महत्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

ह्या व्हिडीओवरील काही निवडक प्रतिक्रिया –  

  • 🤣🤣🤣 तुम्ही गाणे बंद करा, म्हणजे त्या आपोआप जगतील बाई, संदेश चांगला आहे, पण गायकाणे गाण्यालाच मारले, सूर मेले। वो बाई राहुद्या उपकार करा – MAHI BANGAR 
  • लाख वेळा dislike चा option असता तरी मी तितके वेळा dislike केला असता काय भंगार आवाज आहे हिचा 👎👎 – Dj sam
  • अम्रुता ताई तुमच्या स्वत: च्या मुलीला तरी तुमची गाणी ऐकवत जाऊ नका .. मानसिक संतुलन बिघडेल तिचे पण – vishal jadhav
  • वंदनीय मामी,ती नक्की जगेल, फक्त तुमचं गाणं बंद करा, आवाजाला घाबरून गर्भपात व्हायचा एखादीचा!आणि हो, ती जन्माला आली की त्या राज्यात तुमचे सरकार नको, नाहीतर बलात्कार आणि अपरात्रीचे बळजबरी अंत्यसंस्कार आहेतच!आजवर हौशी गायकांच्या दिवाळी पहाटेचा वैताग होता, त्यात तुम्ही भाऊबीज रात्रीची माती करायचा नवीन पायंडा पाडला याबद्दल अभिनंदन 💐जाता जाता, गीतकार, संगीतकार लोकांची पण नावे द्या ना व्हिडीओच्या description मध्ये. आणि हो तेवढे कॉमेंट सुरू करा व्हिडिओच्या खाली 😊- राष्ट्रकडू
  • डिनचॅक पुजाची कमी जाणवून देत नाही मामी तुम्ही. गाणखुळखुळा अमृता मामी आत्तहत्या करण्यासाठी अतिशय योग गाण गायला आहात तुम्ही – manik gavhane
  • हे बेसूर गायन ऐकलं आणि कॉमेंट्स वाचल्या तर एखाद दुसरा पालक मुलीला संगीत क्लास लावू देणार नाही. नका करू अन्याय त्यांच्यावर 🤐.Prat125 
  • मी आयुष्यात खूप निराश होतो मग मी हा आवाज ऐकला आता आत्महत्त्या कशी करायची ह्याचे उपाय शोधतोय 🤣🤣🤣🤣मामीला जगू द्या भक्ताच्या कल्याणा साठी – Jayant Randive
  • एखादा पुरस्कार शिल्लक असला तर देऊन टाका…. #काय तो भसाडा आवाज…Musicची पार वाट लावून टाकली😡😡-Mahesh 0909
  • तुम्ही पाक व चीन सीमेवर गात बसा…आपल्या आवाजाने शत्रू चे सैनिक आपोआप जीव सोडतील…आणि श्री मोदीजी शांतपणे झोप घेतील😂-Machindra Sonwane
  • इतक्या चांगल्या गीताची वाट लागली सुरा मुळे T Series वाल्याना इतकं कळू नये ही बाब अनाकलनीय आहे –  Javedkhan Mulani
  • मान्य आहे गाणं गाणे तुमचा छंद आहे पण तुमच्या छंदांची आम्हाला का म्हणून शिक्षा …🙏-jitu vibhute

दरम्यान  गाण्यावरील अश्या प्रतिक्रिया आल्यानंतरही अमृता यांनी आणखी एक ट्वीट केलं असून या व्हिडिओला दोन दिवसांमध्ये दहा लाख व्ह्यूज मिळाले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘महिलांवर आधारित तिला जगू द्या या गाण्याला दिलेल्या प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानते. दोन दिवसांत या गाण्याला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कौतुक आणि टीका दोघांचही मी स्वागत करते. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येईन,’ असं अमृता यांनी म्हटलं आहे.

गाण्याची Youtube वरील लिंक – https://www.youtube.com/watch?v=DhEjS0I5mBg

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment