Ahmednagar News

पोलीस दल व महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनायोध्दा सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  कोरोना महामारीच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणार्‍या पोलीस दल व महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी महापालिका व प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविले. टाळेबंदी काळात शरद पवार विचार मंचच्या वतीने देखील गरजूंना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करणारे,

तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय अधिकारी व प्रशासनास सहकार्य करण्यात आले. स्वत:च्या जीवाची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सर्वसामान्यांना वाचविण्यासाठी पोलीस दल व महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी मोठे योगदान दिले.

ही जाणीव ठेऊन कर्तव्य बजावणार्‍यांचा गौरव करण्यात आला. महापालिकेत आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, नगर रचनाकार राम चारठाणकर, संजय चव्हाण, सासवडकर, क्यातम, बाळसाहेब व्यापारी, संदीप फाळके, अभियंता निंबाळकर,

पारखे, बापूसाहेब साठे, राहुल साबळे तसेच भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहा. पो.नि. प्रविण पाटील, बेंडकुळे, शिंदे, तोफखाना पोलीस स्टेशनचे पो.नि. हारुन मुलानी, उपनिरीक्षक एम.पी. मेढे, एस.एन. कणसे, डी.एस. मुठे, एस.पी. साळुंके, कृष्णा घायवट, किरण सुरसे यांचा गौरव करण्यात आला.

अल्ताफ सय्यद म्हणाले की, महापालिका प्रशासन व पोलीस दलातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी योगदान दिल्याने कोरोना अटोक्यात आला. शहरात झपाट्याने कोरोनाचे संक्रमण वाढत असताना अनेकांचे जीव धोक्यात आले होते. कोरोनाने अनेक नागरिक मृत्यूमुखी पडत असताना सर्वसामान्यांचे जीव वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन व पोलीस दलातील अधिकारी,

कर्मचार्‍यांनी कोरोनायोध्दाची भूमिका बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शरद पवार विचार मंचचे तालुकाध्यक्ष अर्जुन बडेकर, आयान सय्यद, मुजाहिद सय्यद, अजित भालेराव, शकील सय्यद, अमोल कांबळे, मोहन कड, विजय शिंदे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button