दोन गटात मारामारी,आमदार गोपीचंद पडळकरांचा भाऊ ब्रह्मनंद पडळकरांचा समावेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-सांगली जिल्ह्यात मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला आहे. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात मारामारी झाली असून, यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हे दाखल झालेल्या मध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मनंद पडळकर यांचा समावेश आहे.

दरम्यान ब्रह्मदेव पडळकर यांनी या घटनेशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे.

गावातील मंदिरात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीजण चप्पल घालून आले होते. त्यावेळी मंदिरात चप्पल घालून का आला ? यावरुन वादा झाला होता, यातून गावातील 2 गटात हाणामारी झाली.

या राड्यात त्याठिकाणी असणाऱ्या 2 दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment