ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

माजी मंत्री एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह

0

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  माजी मंत्री एकनाथ खडसे यांना करोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारांसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.

माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी करोनाची चाचणी करुन घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असंही आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

Advertisement

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी दाखल होणार आहे असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना आणि त्यांच्या मुलीलाही करोना संसर्ग झाला.

रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली होती. त्यांची प्रकृती आता चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Advertisement

तसंच आता एकनाथ खडसे यांना करोना संसर्ग झाला आहे. आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आपण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणार आहोत असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
li