वेश्या व्यवसाय चालणाऱ्या हाॅटेलवर छापा, मालकासह एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन …

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे अनैतिक व्यवसाय सुरू असलेल्या हाॅटेल न्यू भरत येथे पोलिस प्रशासनाने छापा टाकून एक तरूणी, दोन ग्राहक व व्यवसाय चालवणाऱ्या मालकाला ताब्यात घेतले.

श्रीरामपूर येथील विभागीय संदीप मिटके, आय. पी. एस. अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हाॅटेलवर छापा टाकून ही धडक कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कारवाई होत असताना राहुरी पोलिसांना थांगपत्ता लागला नाही.

Advertisement

नगर-मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या हॉटेल न्यू भरत या ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची निनावे खबर मिळाली होती. प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी, तसेच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी पोलिस नाईक रंगनाथ ताके,

गणेश फाटक, चालक लक्ष्मण बोडखे, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, अशोक कुदळे तसेच महिला पोलिस हवालदार नूतन काळखेर या फौजफाट्यासह हाॅटेल न्यू भरत येथे छापा टाकला. हाॅटेलवर छापा टाकण्यापूर्वी दोन डमी ग्राहक म्हणून हाॅटेलमध्ये पाठवण्यात आले होते. अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

यावेळी हाॅटेलचालक सय्यद फरहाद इर्शाद अहमद याच्यासह अनैतिक व्यवसाय करणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. याबाबत राहुरी पोलिसांत सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement