सर्व आमदार मंडळी येणार एकाच मंचावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचा उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता मेळावा उद्या रविवारी (ता. 22) रोजी शिर्डी येथे होणार आहे,

या मेळाव्याला सर्व पक्षाचे आमदार मंडळी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष संजय शेळके व जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली.

परिषदेचे संस्थापक आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार आहे. त्याचे स्वागताध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील असून, आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार लहू कानडे यांची उपस्थित असेल. दोन सत्रांत होणाऱ्या या मेळाव्यात संघटनात्मक, तसेच परिषदेच्या कामकाजाचा जिल्हावार आढावा घेऊन,

संघटनेच्या कार्यकर्त्यांचे विचारमंथन होणार आहे. या मेळाव्यास वेणूनाथ कडू, राजेश सुर्वे, संजय पगार, मधुकर उन्हाळे, सुरेश दंडवते, रावसाहेब रोहकले उपस्थित राहणार आहेत, असे राजेंद्र जायभाय, आर. पी. रहाणे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment