मनसे आक्रमक….नगर-दौंड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी दिला ठिय्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील एकही तालुक्यात सध्या धडाचे रस्ते उरलेले नाही. निवडणुका आल्या तरच राजकारणी मंडळी रस्त्यांची कामे आग्रहाने लवकर पूर्ण करतात. अन्यथा या खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचा जीव गेला तरी प्रशासनला आता काही देणे घेणे राहिलेले नाही. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दिसून येत आहे.

दरम्यान नगर-दौंड विद्यानगर ते व्हीआरडीई गेटपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अरणगाव ग्रामस्थ व या परिसरातील नागरिकांसह एमएससीआरडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

भुतारे म्हणाले, नगर-दौंड रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे, तरीही गेल्या अनेक दिवसांपासून व्हीआरडीई ते विद्यानगर भागातील रस्ता पूर्ण केलेला नाही, हा रस्ता खराब झाला आहे. तो दुरुस्त करावा, यासाठी निवेदने, खड्ड्यात वृक्षारोपण केले. परंतु आजपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे हे आंदोलन करत आहे.

हा रस्ता दुरुस्त करून चारपदरी रेल्वेलाइनवरील उड्डाणपुलाच्या कामास सुरुवात करावी; अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला. एससीआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीबाबत सकारात्मकता दाखवत आठ दिवसांत या रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाईल, असे आश्वासन दिले.

त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. या आंदोलनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, दीपक दांगट, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश पवार, अनिकेत जाधव, शुभम साबळे, आकाश कोराळ, मोहन जाधव, राहुल कांबळे, भरत माळवदे, प्रकाश जाधव, आकाश कोलघळ आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment