Ahmednagar News

बुलेटने घेतला चार वर्षाच्या चिमुरडीचा जीव

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-नगर शहरात एमआयडीसी परिसरात प्लॉट क्र.१९ जवळ राहणारे यादव यांच्या कुटुंबातील ४ वर्षांची लहान मुलगी सृष्टी रवीकुमार यादव ही घरासमोर खेळत असताना

सकाळी ८.३० च्या सुमारास भरधाव वेगातील काळ्या रंगाच्या बुलेटवरील चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत सृष्टी हिला बुलेटचो घडक देवून उडविले.

ही धडक इतकी जोराची होती की, या अपघातात सृष्टी यादव या लहान मुलींचा मुत्यू झाला. याप्रकरणी काल मयत सृष्टीचे वडील रवीकुमार पृथ्वीनाथ यादव

यांनी एमआयइसी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन फरार काळ्या बुलेटवरील आरोपीविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार महाजन हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button