जिल्ह्यात या तारखेपासून शाळा सुरु होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे.

मात्र आता महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या आहेत.

त्यानुसार अहदमनगर जिल्ह्यात सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार आहेत. अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबत अधिसूचना जारी करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागदर्शक सूचनादेखील जारी केल्या आहेत.

दरम्यान, “शाळा सुरु करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी,

गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा”,

अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील शाळा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment