महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका सुरू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाढत्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यातच जिल्ह्यातील महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात अद्यापही अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी काल दुपारी शहरातील मालदाड रोड परिसरातील अवैधरित्या पानमसाला बाळगणार्‍या फेरीवाल्यांवर छापा टाकून त्याच्याकडून साडे दहा हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

प्रतिबंधीत अन्न पदार्थांची राज्यामध्ये उत्पादन, वाहतूक, वितरण, साठा व विक्रीस बंदी असतानाही संगमनेरात अशा अन्न पदार्थांची विक्री होत आहे. शहरातील मालदाडरोड परिसरात विविध कंपन्यांच्या पानमसाल्याची वाहतूक होत असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी मालदाडरोड परिसरातील जोर्वेकर विटजवळ छापा टाकून अनिल ज्ञानदेव दिघे याला ताब्यात घेतले. तपासणी केली असता त्याच्याकडे विविध प्रकारचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत विविध कंपन्यांचा 10 हजार 574 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

याबाबत पोलीस नाईक अमित महाजन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून अनिल दिघे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment