Ahmednagar NewsAhmednagar SouthPolitics

युवकांना काँग्रेस मध्ये मोठी संधी – सत्यजीत तांबे

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-काँग्रेस पक्षाला मोठी समृद्ध परंपरा असून ती रायघटनेशी बांधील अशी विचारधारा आहे. काँग्रेसने अनेक संकटातून पुन्हा उभारी घेतली असून जमिनीवरचा कार्यकर्ता हीच या पक्षाची ताकद राहिली आहे. आगामी काळात युवकांना काँग्रेस पक्षातून मोठी संधी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील युवक काँग्रेस व नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुत्त्या व सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.

अमृता लॉन्स येथे युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा व नवीन पदाधिकार्‍यांच्या निवड सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर करण ससाणे, अहमदनगर शहराध्यक्ष किरण काळे, सचिन गुजर, कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, अजय फटांगरे, श्रीगोंदा चे नगराध्यक्ष मनोहर पोटे, प्रशांत ओगले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने अनेक अडचणी पाहिल्या आहेत जमिनीवरील कार्यकर्ता हीच या पक्षाची खरी ताकद राहिली आहे.

जन माणसांचा काँग्रेस पक्षावर मोठा विश्वास असून प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली रायात काँग्रेस पक्षात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेकांनी पक्ष सोडला त्यांची सध्या खूप वाईट अवस्था आहे. त्या जागा आता तरुणांनी घेतल्या आहेत. तरुणांनी सातत्याने लोकांची कामे करा. व कामांचा सातत्याने पाठपुरावा करा. लोक तुमच्या पाठीमागे उभे राहतील.

आगामी काळात तरुणांनी राजकारणात काँग्रेस पक्षातून मोठी संधी असून स्थानिक स्वराय संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरुणांनाच प्राधान्य दिले जाईल. खासदार राहुल गांधी , महसूलमंत्री नामदार थोरात यांचे नेतृत्व तुमच्या पाठीशी भक्कम असून काँग्रेसने कायम सामान्य जनतेच्या विकासाचाच विचार केला आह. पुढील काळात प्रत्येक पदाधिकार्‍यांनी अधिक सक्षमतेने काम करताना काँग्रेसचा विचार तळागाळात पोहोचवा त्याचबरोबर पक्षसंघटना अधिकाधिक मजबूत करताना एकमेकांच्या सुखदु:खात परिवारासारखे सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

करण ससाणे म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात मोठे चैतन्य आले आहे. सत्यजीत तांबे यांनी सातत्याने तरुण वर्गाला या पक्षाकडे आकर्षित केले असून रायभर तरुणांचे मोठे जाळे उभे केले आहे किरण काळे म्हणाले की, आगामी काळात प्रत्येक गावात व शहरातील वाड्यात काँग्रेस पक्षाच्या शाखा मजबूत केल्या पाहिजे येत्या काही दिवसात जिल्ह्यात एक हजार शाखा नवीन सुरू करून जास्तीत जास्त तरुणांना या पक्षाच्या माध्यमातून जनहिताची कामे करण्याची संधी दिली जाणार आहे.

यावेळी सचिन गुजर, अजय फटांगरे, प्रशांत ओगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केली याप्रसंगी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याकारिणीत उपाध्यक्ष म्हणून सोमनाथ चौधरी ( श्रीरामपूर ) , तुषार संजय पोटे (कोपरगाव) , उत्तम पठारे (पारनेर) यांची तर सरचिटणीसपदी बाळासाहेब नाईकवाडी ( अकोले) , सचिन जाधव ( नेवासा ), संदीप पुंड ( नगर तालुका ) , दत्तात्रय कांडेकर (नगर तालुका) ओंकार तोटे ( कर्जत ) शाहरुख बागवान ( राहाता ) यांची निवड केली आहे तर तालुकाध्यक्षपदी अमोल नाईकवाडी ( अकोले ), कोपरगाव तालुका अध्यक्षपदी अजय चांदगुडे,

कार्याध्यक्षपदी सागर बाराहाते, शहराध्यक्षपदी अक्षय अंत्रे, शहर कार्याध्यक्षपदी गिरीश अकोलकर संगमनेर शहराध्यक्षपदी निखिल वेदप्रकाश पापडेजा, राहाता तालुका अध्यक्षपदी राजेंद्र निर्मळ, शहराध्यक्षपदी सचिन गाडेकर, अमृत गायके ( शिर्डी शहराध्यक्ष ) नेवासा तालुका कार्याध्यक्षपदी आकाश धनवटे, कर्जत शहराध्यक्षपदी अमोल भगत, पाथर्डी तालुका अध्यक्षपदी प्रकाश शेलार, शहराध्यक्षपदी दत्तात्रय पाठक, शेवगाव तालुका अध्यक्षपदी बबु्र वडधने,

देवळाली प्रवरा शहराध्यक्षपदी कुणाल पाटील, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्षपदी मदन हाडके , शहराध्यक्षपदी अभिजीत लिपटे, कार्याध्यक्षपदी सरताज इनामदार, राहुरा तालुका अध्यक्ष तुषार जगताप, नगर तालुका अध्यक्ष अ‍ॅड. अक्षय कुलट, पारनेर तालुका अध्यक्ष योगेश शिंदे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष डॉ. गोरख बाचकर, जामखेड तालुका अध्यक्ष शिवराज घुमरे, शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले तर एनएसयुआयच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी आकाश शिरसागर, ऋतुजा महाले तर सरचिटणीसपदी आदेश शेंडग,

प्रियश सरोदे व आदेश काले यांची नियुक्ती झाली आहे तर एनएसयुआयच्या शहर कार्याध्यक्षपदी शेखर सोसे व शहराध्यक्षपदी हैदर सैय्यद , कोपरगाव जयश कदम (तालुकाध्यक्ष), आशपाक सैय्यद ( शहराध्यक्ष ) , ऋषीकेश पगारे ( शहर कार्याध्यक्ष ) , श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी वैभव कुर्‍हे, शहराध्यक्षपदी सनी मंडलीक, शिर्डीच्या शहराध्यक्षपदी आदित्य चव्हाण, राहाता तालुकाध्यक्ष स्वराज त्रिभुवन नेवासा तालुकाध्यक्ष सौरभ ससावणे राहुरी तालुका अध्यक्ष शेखर गाढे, शेवगाव तालुका अध्यक्ष महेश माटे,

पाथर्डी तालुका अध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम बडे पारनेर तालुका अध्यक्ष नवनाथ बाबर, जामखेड तालुका अध्यक्ष बळीराम पवार कर्जत तालुका अध्यक्ष राम जहागीरदार, आकाश कदम ( शहराध्यक्ष ) श्रीगोंदा तालुका अध्यक्ष आदिल शेख, शहराध्यक्ष धीरज खेतमाळीस यांची निवड करण्यात आली आहे यावेळी सुरेश थोरात, दत्तात्रय कोकणे, गौरव डोंगरे, आनंद वर्पे ,सुभाष सांगळे ,

नानासाहेब वाघ, नितीन अभंग ,रमेश गुंजाळ, शैलेश कलंत्री,अभिजीत लुनिया, आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत निखिल पापडेजा यांनी केले. प्रास्ताविक सोमेश्वर दिवटे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर राजू बोर्‍हाडे यांनी आभार मानले. यावेळी विविध तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button