Breaking News Updates Of Ahmednagar

तुमची विमा पॉलिसी मॅच्युअर झालीये? लवकर काढून घ्या रक्कम, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :-जर आपण विमा पॉलिसी घेतली असेल आणि ती मॅच्युअर झाली असेल तर लवकर त्याची रक्कम काढून घ्या.

मॅच्युअर झाल्यानंतर आपण 10 वर्षांपर्यंत पॉलिसीवर दावा केला नसेल तर तुम्हाला ती रक्कम मिळणार नाही. आपली विमा कंपनी ती रक्कम सरकारी खात्यात जमा करेल. ही रक्कम इतर कोणत्याही कामात वापरले जाईल.

Advertisement

आयआरडीएआयचे निर्देश :- भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) अशा पद्धतीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार, जर पॉलिसीधारक मॅच्युअर झाल्यानंतर 10 वर्ष विमा पॉलिसीचा दावा करत नसेल तर त्याला पॉलिसीची मॅच्युरिटी रक्कम मिळणार नाही.

पॉलिसी मॅच्युरिटीच्या 10 वर्षानंतर संबंधित विमा कंपनी त्या पॉलिसीची सर्व रक्कम सरकारी तिजोरीत जमा करेल. आयआरडीएआयने आपल्या नवीन परिपत्रकात असे म्हटले आहे की पॉलिसीधारक नियोजित तारखेच्या 10 वर्षांच्या आत दावा करु शकतात. जर 10 वर्षांपेक्षा जास्त काळ गेला असेल तर पॉलिसीधारकाचा यावर कोणताही हक्क नाही.

Advertisement

ही रक्कम सीनियर सिटीजन वेलफेयर फंडमध्ये जमा केली जाईल :- विमा नियामकाने आदेश दिले आहेत की, सर्व विमा कंपन्यांनी पॉलिसी मॅच्युरिटीनंतर 10 वर्षानंतर दावा न केलेले खाते व त्यातील रक्कम ज्येष्ठ नागरिक कल्याण फंडात जमा करणे आवश्यक आहे.

भारतीय जीवन विमा महामंडळासह हा नियम सर्व विमा कंपन्यांना लागू असेल. नियामकाने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे की सर्व विमा कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर हक्क न सांगितलेल्या रकमेची माहिती द्यावी लागेल. ते दर 6 महिन्यांनी अपडेट केले जावे.

Advertisement

‘इतकी’ आहे हक्क न सांगितलेली (अनक्लेम्ड) रक्कम ;- अंदाजित आकडेवारीनुसार 30 सप्टेंबर 2018 पर्यंत, विमा कंपन्यांकडे 17877.28 कोटी रुपये अनक्लेम्ड रक्कम म्हणून पडून होते.

यापैकी जीवन विमा कंपन्यांकडे 16887.66 कोटी रुपये आणि सामान्य विमा कंपन्यांकडे 989.62 कोटी रुपये होते. आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना वेबसाइटवर क्लेम रकमेची सर्च सुविधा देण्यास सांगितले आहे.

Advertisement

त्याच्या मदतीने, पॉलिसीधारकांना कळू शकेल की या कंपन्यांकडे त्यांच्या नावाची काही रक्कम शिल्लक आहे की नाही. यानंतर तो आपल्या पॉलिसीच्या रकमेवर दावा करु शकतो.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Advertisement
Advertisement
li