पोलिसाची आत्महत्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-राहुरी शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबत आता दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विषारी औषध प्राशन केलेले काॅन्स्टेबल विशाल हापसे यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नी सोनाली व तिचा प्रियकर पोलिस नाईक विशाल खंडागळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनालीला २६ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. दोन महिन्यांपूर्वी श्रीरामपूरहून बदलून आलेले विशाल हापसे हे राहुरी पोलिस ठाण्यात गोपनीय शाखेचे कामकाज सांभाळत होते.

त्यांचे भाऊ देवेंद्र रामराव हापसे (देहरे) यांनी सोनाली व पोलिस नाईक खंडागळे विरूध्द फिर्याद दिली. त्यांच्यातील अनैतिक संबंधात विशाल अडसर येत होता.

विशाल आणि माझे संबंध आहेत. तू आमच्यातून बाजूला हो, नाहीतर तुला मारून टाकू, असा दम देऊन सोनालीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment