बिबट्याच्या हल्ल्यात गाय जबर जखमी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पारनेर तालुक्यातील जामगाव येथील राजवाडा परिसरात शिंदेवस्तीवर गोठ्यातील गायीवर बिबट्याने शनिवारी रात्री हल्ला केला. माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव शिंदे यांच्या घरासमोरील गोठ्यात बांधलेल्या संकरित गायीवर या बिबट्याने हल्ला करून तिला जखमी केले.

या बिबट्यासह तीन पिल्लांचे या परिसरात वास्तव्य असून ते अनेकदा नागरिकांना दिसतात. या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने वनविभागाकडे करण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी परिसरातील अनेक कुत्र्यांचा फडशा पाडला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!