शहरातील चार हजार विडी कामगार संपात उतरणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ व टाळेबंदी काळात घेतलेल्या कामगार विरोधी निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी आयटकच्या सर्व संघटना 26 नोव्हेंबरच्या देशव्यापी संपात उतरणार आहेत. तर शहरातील चार हजार विडी कामगार संपात सहभागी होणार आहे.

संपाच्या पार्श्‍वभूमीवर तोफखाना येथील लाल बावटा विडी कामगार युनियनच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. भाकपचे जिल्हा सहसेक्रेटरी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकेर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीस लाल बावटा विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, खजिनदार कॉ. अंबादास दौंड, कमलाबाई दोंता,

संजय गुरुड, शारदा बोगा, अंगणवाडीच्या सुमन सप्रे, स्मिता औटी आदींसह विडी कामगार महिला उपस्थित होत्या. अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकेर म्हणाले की, मोदी प्रणित केंद्रातील भाजप सरकारने बहुमताच्या आधारे कृषी कायदे व कामगार कायदे सुधारण्याच्या नावाखाली भांडवलदारांचे हित जोपासून नवीन कायदे असतित्वात आनले आहे.

मोठ्या संघर्षाने कामगारांनी मिळवलेले हक्कांवर गडांतर आणून कामगारांना गुलाम बनविण्याच्या उद्देशाने नवीन कायद्याची तरतुद आहे. यामुळे कामगार देशोधडीस लागणार असून, भांडवलदारांचे हित जोपासले जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भारती न्यालपेल्ली यांनी पूर्वी दहा कामगार असणार्‍या कंपनीत तक्रारीवरुन फॅक्ट्री इन्स्पेक्टर तपासणीस जात होते. मात्र ती अट 40 कामगारांची केल्याने कमी कामगार असणार्‍या कंपनीतील कामगारांना हक्कापासून वंचित रहावे लागणार आहे. शंभर कामगार असणार्‍या आस्थापनेस कंपनी कायदे लागू होते.

ही अट तीनशेच्या वर केल्याने भांडवलदारांना एक मोकळीक केंद्र सरकारने दिली आहे. ही कामगार विरोधी धोरणे रद्दे होण्यासाठी सर्व कामगार रस्त्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. अंबादास दौंड यांनी विडी धंद्यातील शहरातील सर्वच कामगार या संपात सहभागी होणार असून,

केंद्र सरकारला कामगार विरोधी धोरणाची किंमत चुकवावी लागणार असल्याचे सांगितले. या संपात आयटक संलग्न विडी कामगार संघटनेसह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा, गटप्रवर्तक कर्मचारी, मोहटादेवी, पतसंस्था कर्मचारी संघटना, अवतार मेहेरबाबा कामगार युनियन सहभागी होणार आहे.

हा संप जिल्ह्यासह अकोले व संगमनेर तालुक्यात यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. कारभारी उगले,

कॉ.सुभाष लांडे, कॉ. शांताराम वाळूंज, निवृत्ती दातीर, बापू कानवडे, बहिरनाथ वाकळे, सुवर्णा थोरात, संजय डमाळ, सतीश पवार, शहादेव पालवे, राहुल पोळ, मारुती सावंत, विठ्ठल खेडकर, सुमन आहेर, दशरथ बालवडे, आशा कर्मचारी उषा अडागळे, सुनिता पथवे प्रयत्नशील आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment