सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! स्टेट बँकेत ‘इतक्या’ जागेंवर होणार ‘अशी’ भरती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) च्या एकूण 2000 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाइन मोडमध्ये अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2020 पर्यंत आहे. प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेत यशस्वी उमेदवार मुलाखतीत उपस्थित राहतील.

 पद संख्या- 2000 (प्रोबेशनरी ऑफिसर)

योग्यता:-  या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठाच्या कोणत्याही स्ट्रीममध्ये पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आपण ऑफिशियल माहिती पाहू शकता.

वयोमर्यादा :- सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 01 एप्रिल 2020 पर्यंत किमान वय 21 ते 30 वर्षे दरम्यान निश्चित केले गेले आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी नियमानुसार वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.

पगार – 23,700 – 42,020 रुपये

सिलेक्शन प्रोसेस:-  यासाठी उमेदवारांची निवड प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. प्राथमिक परीक्षेत 100 गुणांचे एकूण 100 वस्तुनिष्ठ प्रश्न इंग्रजी भाषा, क्वांटिटेटिव्ह एप्टीट्यूड आणि रीझनिंग एबिलिटी आधारित विचारले जातील.

 अर्जाची अंतिम तारीख- 4 डिसेंबर 2020

असा करा अर्ज :- इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडिया https://bank.sbi/careers च्या अधिकृत वेबसाइटवर 04 डिसेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज फी जनरल,

ओबीसी, ईडब्ल्यूएस – 750 रुपये एससी,

एसटी, पीएच – शुल्क नाही

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment