अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर रविवारी रात्री कर्जत पोलिसांनी आक्रमक कारवाई केली आहे.

पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात अली आहे.

या कारवाई दरम्यान १ ट्रॅक्टर, २ चार चाकी ट्रॉली असा मला जप्त करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पोलीस पथकाने दोघांना अटक केली आहे.

दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी कि, लोणी मसदपुर येथील कान्होळा नदी पात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या वाळु उपसा करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून समजली.

त्यानुसार त्यांनी तात्काळ रात्र गस्त करणाऱ्या पोलीस पथकाला माहिती देवून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले असता त्यांना काही लोक ट्रॅक्टरमध्ये अवैध वाळु उपसा करताना आढळून आले.

पोलिसांनी तेथे छापा टाकुन १ ट्रॅक्टर, २ चार चाकी ट्रॉली व २ व्यक्तींना ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल सुनिल खैरे यांच्या फिर्यादीवरुन दोघांना अटक केली.

पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल सुनील खैरे, मनोज लातूरकर, पोलीस नाईक नरोटे यांच्या पथकाने ही ठोस कारवाई केली. पुढील तपास पोलीस नाईक भांडवलकर करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment