कांदा चाळीच्या अनुदानासाठी शेतकऱ्याचे उपोषण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन २०१८-२०१९ मधील कांदा चाळीचे प्रलंबित अनुदान त्वरित मंजूर करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पैशासाठी वेठीस धरणार्‍या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी,

या प्रमुख मागण्यांसाठी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर नेवासे तालुक्यातील बाभूळखेडा येथील शेतकरी उपोषणास बसले आहेत.

शेतकऱ्यांचा हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. कांदा चाळीचे प्रलंबित अनुदान मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी यापूर्वी शेतकर्‍यांनी २४ मार्च २०२० रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी शेतकऱ्यांना कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या आश्वासनामुळे तसेच कोरोना प्रादुर्भावामुळे हे उपोषण स्थगित करण्यात आले होते.

त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळोवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला लेखी निवेदन देऊन कांदा चाळीचे अनुदान मंजूर करण्याची मागणी केली. परंतु मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा २३ नोव्हेंबरपासून उपोषणास सुरुवात केली.

या उपोषणामध्ये अनिल लक्ष्मण विधाटे, ॲड. पांडुरंग केशव औताडे, रमेश दामोदर जगताप, रवींद्र सोपान होले, नवनाथ रमेश मते, भिवाजी शिरसाठ, बापूसाहेब भानुदास घोलप, गीताराम कडुबाळ रोडगे, विनायक श्रीधर विधाटे, उमाजी विधाटे या शेतकऱ्यांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment