इंदुरीकर खटला! पुढील सुनावणी पूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाकडे नगरकरांसह अनेकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान इंदोरीकर यांच्या प्रकरणाला आज (बुधवार ता.25) नवीन मिळाले.

या प्रकरणाच्या सुनावणी आधी अचानक सरकारी वकिलांनी माघार घेतल्यामुळे गोंधळ उडाला. यामुळे पुढील सुनावणी पूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करण्याची मागणी ‘अंनिस’च्या अ‍ॅड.रंजना गवांदे यांनी केली आहे.

इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आज संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, अचानक सुनावणीच्या काही तासांआधीच सरकारी वकिलांनी माघार घेतली.

सरकारी वकिलांनीच माघार घेतल्यामुळे आजची सुनावणी होऊ शकली नाही. आता पुढील सुनावणी 2 डिसेंबर रोजी होणार आहे. दोन्ही बाजुंनी युक्तिवाद केला जाणार होता.

परंतु, सरकारी वकिलांनी अचानक खटल्यातून माघार घेतली. आता पुढील सुनावणीपूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करावी, अशी मागणी ‘अंनिस’च्या अ‍ॅड.रंजना गवांदे यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment