तीन तोंडी सरकारच्या घोषणे’ चे श्राद्ध घालून केले आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे आर्थिक हतबल झालेल्या नागरिकांना महावितरणने वाढीव वीजबिले पाठवून शॉक दिला आहे.

आधीच कोरोनामुळे गेली अनेक महिने नागरिकांच्या हाताला कामे नसल्यानी अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यातच 100 युनिट मोफतची घोषणा केलेल्या महाविकास आघाडी सरकारने आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे.

यामुळे अडचणीत सापडलेले नागरिकांकडून महावितरण सक्तीने वीजबिल वसुली करत आहे. याचाच निषेध म्हणून चक्क स्मशान भूमीत आंदोलन करण्यात आले.

लॉकडाऊन मुळे शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित – असंघटित कामगार, मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार असे सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत,

अशा बिकट परिस्थितीत शासनाकडून मदत मिळण्या ऐवजी, केवळ पोकळ घोषणाबाजी करण्यात आली. ५० टक्के विज बील माफ करु” परंतु राज्यातील तीन तोंडी राज्य सरकारने,

५० टक्के विजबील माफी तर सोडाच, पण ग्राहकांना वाढीव वीजबिले देऊन, वीजबिल न भरल्यास, लाईट कनेक्शन कट करण्याची भाषा राज्यातील तीन तोंडी सरकार करत असल्याने,

“सिटीझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र”या पत्रकार संघाच्या आयोजनाखाली श्रीरामपुर येथे सर्व पक्षीयांच्या वतीने हिंदु स्मशानभूमीत, राज्यातील तीन तोंडी सरकारच्या घोषणे’ चे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे, या आंदोलनकरिता बनविण्यात आलेली श्राद्धाची पत्रिका, ज्यात कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की, राज्य सरकारच्या सुंदर ‘घोषणेचा अपघाती मृत्यु झाला असून, घोषणा मेल्याने उभा महाराष्ट्र हळहळत आहे ,

हे दुःख व्यक्त करण्यासाठी सर्व पक्षीय भावपूर्ण श्रध्दांजलीं वाहण्यात आली, तसेच माय बाप सरकार तीन तोंडांचे (पक्षांचे) कोणत्या तोंडाकडे पहावे ?

असा सवाल देखील या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलकांनी उपस्थित केलाय. आंदोलना दरम्यान हिंदु प्रथे प्रमाणे पुरोहित राजेंद्र जोशी यांनी श्राद्ध पूजा केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment