Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsPolitics

स्वच्छतेच्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-दोन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून नगर शहर कचरा कुंडीमुक्त झाले. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे नगर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात ३० व्या स्थानावर आले.

आता पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्व नगरकरांच्या सहकार्यातून नगर शहर देशात टॉपटेन करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

शहरातील सारसनगर येथे भुयारी गटार अमृत योजना उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, भाऊसाहेब पांडुळे, महादेव कराळे, छबुराव कांडेकर, धर्मा करांडे, नाना फुलसौंदर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, स्वच्छता असल्यास आरोग्य समस्या निर्माण होत नाही. शहरातील विकासकामांमुळे शहराचा व उपनगरांचा विस्तार वाढत आहे. स्वच्छतेबरोबरच शहरातील पथदिव्यांचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत मार्गी लागणार आहे. विद्युत खांबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. भुयारी गटार योजनेचे काम लवकरच पूर्ण होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button