रस्त्याची झाली दुर्दशा… अपघाताचे प्रमाण वाढले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते.

नागरिकांचा जीव गेला तरी प्रशासनाला मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीचे काही घेणे देणे राहिलेले नाही. मात्र याच नादुरुस्त रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

यातच पाथर्डी तालुक्यातील देवराई ते श्रीक्षेत्र वृद्धेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून या रस्त्याच्या दुतर्फा बाजूने झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने या झाडांच्या आडोशामुळे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाचा अंदाज पटकन येत नाही.

तसेच ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत असून अनेकवेळा लहान-मोठे अपघातदेखील होत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून सरकारने सर्व मंदिरे उघडण्याचे सांगितल्यानंतर श्रीक्षेत्र वृध्देश्वर, श्रीक्षेत्र मढी,

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड या देवस्थानकडे जाणारा देवराई ते वृद्धेश्वर हा महत्त्वाचा रस्ता असून मंदिरे उघडल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या भाविकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील आठ दिवसांत या रस्त्यावर लहान-मोठे तीन अपघात घडले असून या अपघातामध्ये अनेक भाविक देखील किरकोळ जखमी झाले आहेत.

त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा बाजूंनी असणारी सर्व झाडेझुडपे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तत्काळ हटवावीत, तसेच रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे डांबर टाकून दुरुस्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment