Best Sellers in Electronics
Ahmednagar CityAhmednagar NewsPolitics

हेलिकॉप्टर सफरीबाबत खुलासा झाल्यानंतरही शिळ्या काढिला ऊत कशाला ?

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर शिवसेनेत गट तट आता नाहीत . शिवसैनिकातील नाराजी नाट्य आता पूर्णपणे संपलेले आहे . शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याबाबत शहर शिवसेनेत कधीच नाराजी नव्हती .

त्यांना पदावरून हटविण्याबात आमच्यात कधी चर्चाच झालेली नसताना व स्थानिक आमदारांची सरचिटणीस मिलिंद नार्वेकर साहेबांसोबत झालेली हेलिकॉप्टर सफर याबाबत पक्षश्रेष्ठीकडून खुलासा झालेला आहे .

यामुळे पुन्हा शिळ्या कढीला ऊत का आणला जातोय असा सवाल नगर शहर शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे. नगर शहर शिवसेना एक संध आहे .

पक्षात कुणीही नेतृत्व व संपर्क प्रमुख याबद्दल नाराज नाही असे असताना शिवसेनेला व पक्ष श्रेष्टींना बदनाम करण्याचा प्रकार का केला जातोय .

या गैरप्रकाराचा बोलावता धनी कोण ? याचा शोध शिवसैनिक नक्की घेतील आणि त्याला शिवसेनास्टाईल धडा शिकवला जाईल .

व्यक्तिगत लाभाकरिता माध्यमांचा व संघटनेचा गैरवापर पक्षातील कुणीही करू नये, पक्षाला वारंवार बदनाम करणाऱ्यानी अगोदर आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत आणि मगच असे विचित्र खटाटोप करावेत असा सल्ला जाधव यांनी दिला आहे.

मिलिंद नार्वेकर हे नगर दौऱ्यावर आलेले असतांना सोनईतुन त्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा त्यात अचानक स्थानिक आमदार बसले . संपर्क प्रमुखांनी ही भेट घडवून आणल्याची शहरात चर्चा होती .

मात्र हेलिकॉप्टर मध्ये ऐनवेळी त्रयस्थ प्रवाशाला बसण्यास परवानगी देता येत नसते . त्याची रीतसर पूर्व परवानगी काढावी लागते. शिवसेना सरचिणीस मिलिंद नार्वेकर साहेबांच्या निर्देशानुसार हे झाले असल्याने त्याचा संपर्क प्रमुखांशी काहीच संबंध नाही याचा रीतसर खुलासा पक्ष श्रेष्ठीकडून झालेला आहे

त्यामुळे खोट्या बातम्या देऊन सवंग प्रसिद्धी मिळवण्याचे प्रकार थांबवा. शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असे गिरीश जाधव यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button