प्रलंबित मागण्यांसाठी महसूल विभागाचा एक दिवसीय संप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

याच आंदोलनाला साथ म्हणून नेवासा येथे देखील एक दिवसीय संप पुकारण्यात आला होता. आज 26 नोव्हेंबर रोजी सकाळी नेवासा येथील महसूल कर्मचार्‍यांनी प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या मांडून एक दिवसीय लाक्षणिक संपात सहभाग घेतला आहे.

दरम्यान आज राज्यात ठिकठिकाणी सरकारी कार्यालये तसेच रस्त्यांवर आंदोलने करण्यात येत आहे. कृषी विधयेक व कामगार विरोधी कायदे यांच्या निषेधार्थ आज आंदोलने करण्यात येत आहे.

यातच कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ यांच्या अहवालानुसार

राज्यातील कर्मचारी 26 नोव्हेंबर रोजी लाक्षणिक संप आंदोलन करत असल्याने त्यास पाठिंबा म्हणून नेवासा येथील महसूल कर्मचार्‍यांनी लाक्षणिक संप नेवासा तहसील कार्यालयासमोर बसून केला आहे.

यावेळी प्रलंबित मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना, खाजगीकरण/कंत्राटीकरण धोरणे रद्द करणे, अंशकालीन व कंत्राटी कर्मचार्‍यांच्या सेवा नियमित करणे, मुदतपूर्व सेवानिवृत्तीचे जाचक धोरण रद्द करणे,

नवीन कामगार कायदे रद्द करणे, केंद्रीय कर्मचार्‍यांना देय ठरणारे सर्व भत्ते राज्य कर्मचार्‍यांना मंजूर करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

या संपामध्ये मोठ्या संख्येने महसूल कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment