नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. थोडासा निष्काळजीपणा लाटेला पूरक ठरू शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
तहसील कार्यालयात मंगळवारी आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात करावयाच्या उपाय योजनांबाबत बैठक झाली. यावेळी ते म्हणाले, दिवाळीत नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तालुक्यात शंभर बेडचे कोविड केअर सेंटर व १६ ऑक्सिजन बेड, २ व्हेंटीलेटर मशीन व २ बायपॅप मशीन, मॉनिटर, २० केव्ही जनरेटर सुविधासह युक्त असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे.
मात्र, कोविड अजून संपलेला नाही हे नागरिकांनी लक्षात घ्यावे. लवकरच लग्नसराई सुरु होत आहे. त्यामुळे गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी असे समारंभ टाळावेत. कमीत-कमी व्यक्तींच्या उपस्थितीत समारंभ करावेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved