मोठी बातमी ! आणखी 43 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी , ‘ही’ आहेत नावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-ठी बातमी ! आणखी 43 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी , ‘ही’ आहेत नावे केंद्र सरकारने मंगळवारी आणखी 43 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली. सरकारने असे म्हटले आहे की माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत भारतीय वापरकर्त्यांसाठी या 43 मोबाइल अ‍ॅप्सवर प्रवेश प्रतिबंधित केला जात आहे.

भारताच्या सार्वभौमत्वास , अखंडतेस, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस हानिकारक अशा मोबाइल अ‍ॅप्सवर कारवाई केली गेली आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत एक आदेश जारी केला असून 43 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

यात कोणते अ‍ॅप्स समाविष्ट आहेत :- यातील काही अ‍ॅप्स चिनी कंपन्यांचे अ‍ॅप्स आहेत ज्यात चीनच्या रिटेल दिग्गज अलिबाबा ग्रुपच्या चार अ‍ॅप्स चा समावेश आहे. या अ‍ॅप्समध्ये अलीसप्लायर्स मोबाईल अ‍ॅप, अलिबाबा वर्कबेंच, अलीएक्सप्रेस – स्मार्ट शॉपिंग, बेटर लिव्हिंग आणि अलिपे कॅशियरचा समावेश आहे. तुम्हाला माहीतच असेल की 29 जून आणि 2 सप्टेंबर रोजी सरकारने भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेचे कारण देत अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली. दोन्ही वेळा बहुतेक बंदी घातलेले अ‍ॅप्स मूळचे चिनी होते.

 कधी किती अ‍ॅप्सवर बंदी घातली?:-  आज सरकारने 43 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यापूर्वी 29 जून 2020 रोजी भारत सरकारने 59 मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती आणि 2 सप्टेंबर 2020 रोजी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 A अंतर्गत आणखी 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. सरकारने असे म्हटले होते की ते सर्व आघाड्यांवर नागरिकांच्या हिताचे संरक्षण आणि देशाच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी कटिबद्ध आहेत आणि हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व शक्य पावले उचलली जातील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment