इंदुरीकर महाराजांच्या खटल्याची सुनावणी २ डिसेंबरला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कीर्तनातून पीसीपीएनडीफ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या विरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा निकाल काय लागणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता ०२ डिसेंबरला होणार आहे.

तत्पूर्वी इंदोरीकर यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकीलपत्र मागे घेतल्याने एक नवीनच पेच निर्माण झाला होता.

नुकतेच नवीन सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड यांची नियुक्ती झाली असून कोर्ट रजेवर असल्याने या खटल्याची सुनावणी आता 2 डिसेंबरला होणार आहे.

या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर इंदुरीकरांतर्फे के. डी. धुमाळ तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रंजना गवांदे बाजू मांडत आहेत.

खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकीलपत्र मागे घेतल्याने नवीन सरकारी वकील म्हणून अरविंद राठोड यांची नियुक्ती झाली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment