वीजबिल माफीसाठी मनसे आक्रमक; महावितरण कार्यालयात तोडफोड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती.अनेकांची कामं,उद्योग ठप्प होते.त्यामुळं या काळातील वीज बिल माफ करावे अशी मागणी होते आहे.

यासाठी राज्यभर सरकारविरोधात संतप्त भावना आहेत. वीजबिल माफ करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करणाऱ्या मनसेने आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यानी आज महावितरण कंपनींच्या कार्यालयावर हल्लाबोल करत कार्यालयाची तोडफोड करून शासनाला थेट आव्हान दिले आहे.त्यामुळे कोपरगावात पोलिसांची ऐनवेळी एकाच धावपळ उडालेली दिसून आली आहे.

कोरोना काळात वापरलेल्या विजेच्या दरात सवलत देण्याचे संकेत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले होते, मात्र त्यांनी दिलेल्या शब्दावरून घुमजाव केल्याने त्याचे विदारक परिणाम आता राज्यात उमटू लागले आहे.

टाळेबंदीच्या काळातील भरमसाठ वीजबिल आल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.राज्य सरकारचे घरगुती वीज बिल माफ करावे या मागणीसाठी कोपरगावमध्ये हि मोठी नाराजी आहे.

त्यामुळे कोपरगाव मनसेच्या वतीने वारंवार सरकारला इशारा देण्यात आला आहे. किमान तीन महिन्यांचे वीज बिल माफ करा अशी मागणी मनसेने वारंवार करूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही.

त्यामुळे आक्रमक मनसेने थेट महावितरणच्या कार्यालयात घुसून कार्यालयातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड, योगेश गंगवाल, आदींनी हे आंदोलन केले आहे.

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, उपनिरीक्षक भरत नागरे यांनी या कार्यकर्त्याना ताब्यात घेतले आहे. व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment