विजेचे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस जळाला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-विजेचे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस जळाला. ही घटना मंगळवारी खुंटेफळ रोड येथे घडली. शेवगाव-खुंटेफळ रस्त्यालगत संतोष जगन्नाथ शित्रे यांचे शेत आहे.

त्यांच्या शेतामधून महावितरणच्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्या आहेत. मंगळवारी या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले. ठिणग्या उसाच्या पाचटावर पडून आग लागली.

ही आग वाऱ्याच्या झोताने पसरल्याने शित्रे यांचा एक एकरातील ऊस जळून खाक झाला. आग लागल्याचे कळताच जवळच्या वस्तीवरील रहिवाशांनी शेताकडे धाव घेऊन आग शमवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, वाऱ्याच्या झोताने आगीचे लोट अंगावर येत असल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. या परिसरात शॉर्टसर्किट वारंवार होते.

मात्र, महावितरणचे कर्मचारी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतात, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले. महावितरणच्या गलथानपणाबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment