Ahmednagar NewsAhmednagar North

प्रलंबित मागण्यांसाठी भेंड्यामध्ये रास्तारोको

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगारविरोधी चार श्रम संहिता रद्द करा,किमान वेतन दरमहा रु. 21 हजार करावे, असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना आरोग्य विमा , पेन्शन,एस.आय , प्रॉव्हिडंट फंड इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात…

आदी प्रलंबित मागण्यांसाठी नेवासा तालुका किसान सभा व हमाल पंचायतीच्या वतीने तालुक्यातील भेंडा येथे बसस्थानक चौकात नेवासा-शेवगाव रस्त्यावर 15 मिनिटांचे रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

हमाल पंचायत व किसान सभेचे नेते कॉ.बाबा आरगडे यांचे नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या कामगारांच्या देशव्यापी बंदला पाठींबा देण्यासाठी गुरुवार दि.26 नोव्हेंबर रोजी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

सकाळी 11 ते 11:15 या 15 मिनिटांचा रस्तारोको करून निवासी तहसीलदार राजेंद्र गायकवाड व पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रस्तारोको पूर्वी बसस्थानकासमोरील प्रांगणात करण्यात आला.

यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवडेनात म्हंटले आहे कि, सर्वांना नोक-या किंवा बेरोजगार भत्ता द्या, कोविड -19 चे कर्तव्य बजावणाऱ्या आशा आणि अंगणवाडी कर्मचारी ,एनएचएम कर्मचारी यांसहित सर्व खासगी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने द्यावीत त्यांना 50 लाखांचा विमा,

जोखीम भत्ता, नुकसान भरपाई, मोफत औषधोपचार , प्राधान्याने कोविडची लस द्यावी,कामकाजी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व आरामकक्षांची सुविधा , सर्व कामकाजी महिलांना 6 महिन्यांची पगारी बाळंतपणाची रजा, महिला काम करीत असलेल्या सर्व आस्थापनांमध्ये पाळणाघरांची सुविधा,

शेतकऱ्यांना वीजबिल माफी व कर्जमाफी द्यावी, तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन रु.11 हजार व रु.14 हजार लागू केले आहे, शासनाने त्याची तरतुद करुन कर्मचाऱ्यांना हे वेतन ऑनलाईन द्यावे या आणि इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button