वाळू तस्करांनी तलाठी व महसूल कर्मचाऱ्याला बदडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात वाळू तस्करांकडून अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु आहे. तसेच त्यांच्यावर कारवाईसाठी गेलेली अधिकारी कर्मचाऱ्यांवर आजवर अनेकदा जीवघेणा हल्ला केल्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार संगमनेर तालुक्यात घडला आहे.

तालुक्यातील घारगाव शिवारात नाशिक पुणे महामार्गावर अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असलेले डंपर संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथकाने पकडले,

असता वाळूतस्कारांकडून तलाठी व महसूल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तलाठी रवींद्र मुकुंदराव हिरवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

त्यानुसार अविनाश रोहिदास डोंगरे (रा. अकलापूर ता. संगमनेर), संकेत हरिभाऊ लामखेडे (रा. केळेवाडी ता. संगमनेर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान याबाबत फिर्यादींनी म्हंटले आहे कि, तालुक्यात नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जातो. वाळू तस्करी रोखण्यासाठी तहसीलदार अमोल निकम यांनी अधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतूक शोध पथक कार्यरत करण्यात आले.

हे पथक मंगळवारी रात्री गस्तीवर असताना पथकातील तलाठी हिरवे यांना अकलापूर येथून वाळूने भरलेला डंपर येत असल्याची माहिती मिळाली. हिरवे यांनी याबाबत घारगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना माहिती दिली.

त्यांना सोबत घेऊन मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर घारगाव शिवारातील कुरकुंडी फाटा येथ वाळूने भरलेले डंपर पथकाने पकडले.

हे डंपर घारगाव पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना अविनाश डोंगरे हा स्कॉर्पियो गाडीतून आला. त्याने डंपरला गाडी आडवी लावून त्यांना थांबवून तलाठी हिरवे व पथकातील कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

चालकाला डंपरमधील वाळू खाली करण्यास सांगितले. वाळू खाली केल्यानंतर डंपर पळवून नेण्यात आले. दरम्यान दोन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सध्या हे दोघेही आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment