26 – 11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान यांना श्रद्धांजली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  मुंबईत झालेल्या 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशावरून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम पोलीस बॉईज असोसिएशन अहमदनगर जिल्ह्यात तर्फे घेण्यात आला.

यावेळी नौशाद रफिक शेख, जिल्हाध्यक्ष पोलीस बॉईज असोसिएशन. प्रशांत उजागरे, जिल्हा उपाध्यक्ष. मोसिन सय्यद, सचिन गायकवाड, रोहित घायतडक, प्रशांत माळी, आनंद गीते, मुशरान कुरेशी,

किशोर मुटकुळे, निखिल कानडे, रोहित उजगरे आदी उपस्थित होते. नौशाद शेख म्हणाले की देशाच्या सुरक्षितेसाठी प्राणाची आहुती देणाऱ्या जवान व पोलिसांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

व  नेहमीच पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवादी कारवाया केल्या आहेत कसाब सारख्या दहशतवादाला जिवंत पडल्याने ही बाब उघड झाली असे हल्ले परतून लावण्यासाठी पोलीस व लष्कर सज्ज आहे मात्र प्रत्येक नागरिक संजग व जाग्रुक झाल्यास कोणताही शत्रू भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment