विद्यमान आमदार रोहित पवार यांचे नाव का टाळले ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कर्जत येथील नगरपंचायतने शहरात तयार केलेल्या दोन उद्यानांच्या लोकार्पण समारंभात कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचे नाव का टाळले, याचा जाब राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी विचारला असून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केली.

नगरपंचायतचा कार्यकाळ संपत आल्याने कर्जत शहरातील शहा बाग आणि समर्थ बाग या उद्यानांचे काम अपूर्ण असतानाही उपनगराध्यक्ष राऊत यांनी घाईगडबडीत लोकार्पण सोहळा आयोजित केला.

कोनशिलेवर मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार रोहित पवार यांचे नाव प्रोटोकॉलप्रमाणे असणे गरजेचे होते, परंतु ते टाळण्यात आले. शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या योजनेच्या उदघाटनाचीही त्यांनी घाई केली होती.

नळाला येणारे पाणी शुद्ध आहे असे ते म्हणतात, मग भाजपचे काही पदाधिकारी टँकरवर नामदेव राऊत यांचा फोटो लावून प्यायचे पाणी का वाटतात?

नगरपंचायतने खासगी पाण्याच्या टँकरचे टेंडर का काढले? किती नगरसेवक नळाचे पाणी पितात, असा सवाल शेलार यांनी केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment