Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

चिंताजनक : चोवीस तासांत जिल्ह्यातील ‘इतक्या’ कोरोना रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनामुळे चोवीस तासांत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ९२० झाली आहे. दिवसभरात नवे २७३ पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील सर्वाधिक ४५ नगर शहरातील आहेत.

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्या होत्या. आता चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच नगर शहरातील बाजारपेठेत गर्दी कायम आहे.

गेल्या महिन्याभरात रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाण काहीसे घटले होते. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. दिवाळीनंतर मात्र रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. मंगळवारी तीनशेहून अधिक रुग्ण जिल्ह्यात आढळून आले. बुधवारी २७३ रुग्ण आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०, खासगी प्रयोगशाळेत ११९ आणि अँटीजेन चाचणीत १४४ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ७, नगर ग्रामीण १, संगमनेर १, इतर जिल्हा १, खासगी प्रयोगशाळेत मनपा ३१, अकोले ७, जामखेड २, कोपरगाव ६, नगर ग्रामीण ८, नेवासे १४, पारनेर ४, पाथर्डी ५,

राहाता १२, राहुरी ६, संगमनेर १८, शेवगाव २, श्रीगोंदे १ आणि श्रीरामपूर ३, अँटीजेन चाचणीत मनपा ७, अकोले १२, जामखेड २, कर्जत १४, कोपरगाव ५, पारनेर १८, पाथर्डी १६, राहाता १३, राहुरी ४, संगमनेर १०, शेवगाव १४, श्रीगोंदे ८, श्रीरामपूर २१ रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: ahmednagarlive24.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button